Aapla Mavla : आपला मावळाच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी रामभाऊ झिने यांची निवड

Aapla Mavla : आपला मावळाच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी रामभाऊ झिने यांची निवड

0
Aapla Mavla : आपला मावळाच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी रामभाऊ झिने यांची निवड
Aapla Mavla : आपला मावळाच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी रामभाऊ झिने यांची निवड

Aapla Mavla : महाराष्ट्रभर तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही असणाऱ्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांवर गड किल्ले संवर्धन, वृक्षारोपण तसेच स्वच्छता मोहीम राबविणारी व सामाजिक सेवेत अग्रेसर असणारी आपला मावळा (Aapla Mavla) संघटनेच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ झिने (Rambhau Zhine) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना आपला मावळा संघटनेचे संस्थापक खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांच्या हस्ते नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले.

नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ

संघटनेची मजबूत बांधणी करतील असा खा. लंकेंना विश्वास

यावेळी आपला मावळाचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर निमसे व प्रदेश सचिव प्रा.सीताराम काकडे हे उपस्थित होते. आपला मावळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या गड किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेमध्ये रामभाऊ झिने हे सक्रिय असून, यापुढेही आपला मावळाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील व शहरांमध्ये संघटनेची मजबूत बांधणी करतील असा विश्वास यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.

Aapla Mavla : आपला मावळाच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी रामभाऊ झिने यांची निवड
Aapla Mavla : आपला मावळाच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी रामभाऊ झिने यांची निवड

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लवकरच शहराची कार्यकारिणी जाहीर करणार (Aapla Mavla)

आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवराय व बहुजन महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना अनेक महत्त्वपूर्ण समाज उपयोगी उपक्रम झिने यांनी राबवावेत व समाजाप्रती आपले योगदान द्यावे. ते विचारी तरुणांचे संघटन करून त्यांच्या विकासासाठी, रोजगारासाठी प्रयत्न करतील असे आवाहन प्रा.सीताराम काकडे यावेळी बोलताना केले. तर संघटनेसाठी वेळ देऊन लवकरच शहराची सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर करणार असून तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह सर्वच महापुरुषांच्या विचारानं समाजामध्ये एकोपा कसा राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झिने यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास आपला मावळा व निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. ॲडवोकेट राहुल झावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आपला मावळाचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.