NCP State President Post : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदासाठी संग्राम जगतापही इच्छुक…मात्र सुनेत्रा ताईच्या मनात…

NCP State President Post : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदासाठी संग्राम जगतापही इच्छुक…मात्र सुनेत्रा ताईच्या मनात…

0

NCP State President Post : अहिल्यानगर : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून (NCP State President Post) रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनीही या पदाबाबत आपली इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल, असे स्पष्ट करत त्यांनी संयमाची भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना, “राज्याचं नेतृत्व पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केलं आणि त्या मुख्यमंत्री झाल्या तर मला आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली होती.

आमदार संग्राम जगताप म्हणाले,

यावर प्रतिक्रिया देताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, अजितदादांशी सगळ्यांचीच जवळीक आहे. त्या भावनेतून दत्ता भरणे यांनी ते वक्तव्य केले असावे. मलाही तसंच वाटतं. मात्र जोपर्यंत पक्षाचा अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही.

प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारले असता जगताप म्हणाले, जसं सगळ्यांना वाटतं, तसंच मलाही वाटतं. मात्र प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईलच असं नाही. ज्यांच्या वाट्याला संधी येईल, त्यांनाच जबाबदारी मिळेल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वक्तव्याने प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चांना आणखी बळ (NCP State President Post)

पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मनात जे असेल, त्यानुसार त्या योग्य व्यक्तीवर जबाबदारी सोपवतील अशी प्रतिक्रिया जगताप यांनी दिली आहे. जगताप यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चांना आणखी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.