Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचं उपोषण नेमकं कशासाठी? मागण्या काय?

0
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचं उपोषण नेमकं कशासाठी? मागण्या काय?
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचं उपोषण नेमकं कशासाठी? मागण्या काय?

नगर : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचे मागील १८ दिवसांपासून बेमुदत उपोषण (Hunger strike) सुरू आहे.आज त्यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस आहे. या उपोषणामुळे त्यांचं वजन सुद्धा कमी झाले आहे. सोनम वांगचुक २० जूनपासून जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) आंदोलनात सहभागी झाले आहेत. नीट परीक्षेतील अनियमिततेबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचुक आमरण उपोषण का करत आहेत? सरकारकडे त्यांच्या काय मागण्या आहेत? याविषयी जाणून घेऊ.

नक्की वाचा : देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व म्हणून आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य

सोनम वांगचुक यांच्या मागण्या काय? (Sonam Wangchuk)

दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी ६ जून रोजी केली होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या यांच आंदोलनाला वांगचुक यांनी २ जूनला पाठिंबा दिला होता. तसेच आंदोलकांना त्यांनी “देशभक्त” संबोधले होते. त्यानंतर वांगचुक यांनी ६ जून रोजी आंदोलनात सहभाग घेतला. २० जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी दोन मागण्या केल्या.

एक म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि दुसरी म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा द्यावा व सहाव्या परिशिष्टात समावेश करावा, अशा दोन मागण्या त्यांनी ठेवल्या. या मागण्या मान्य करण्यासाठी वांगचुक यांनी केंद्र सरकारला २७ जून पर्यंतचा अवधी दिला. यातील एक जरी मागणी पूर्ण झाली तर आपण उपोषण संपवू असेही ते म्हणाले होते. परंतु केंद्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. त्यांच्याबरोबर AISA या संघटनेचे आणखी सहा सदस्य उपोषणाला बसले.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांचे वीजबील माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारची भूमिका काय? (Sonam Wangchuk)

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची कॉक्रोच जनता पार्टीने मागणी केली आहे. पेपर फुटल्यानंतर मे महिन्यात नीट  परीक्षा रद्द झाली. १४ हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यामुळे आत्महत्या केली. याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. परंतु, त्यांच्या राजीनाम्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही, असे कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले होते.

वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवले तर काय होईल? (Sonam Wangchuk)

डॉक्टरांनी सांगितले की, उपोषण करणाऱ्याचे जिवंत राहणे हे त्याच्या शरीराच्या हायड्रेशन, बॉडी फॅट आणि आरोग्यावर अवलंबून असते. एखादी व्यक्ती फक्त मिठाचे पाणी घेत असेल तर ती व्यक्त २ ते ३ महिने जिवंत राहू शकते. परंतु, जर शरीराचे वजन १० टक्क्यांहून अधिक घटले तर वैद्यकीय देखरेखीत राहण्याचा सल्ला दिला जातो. सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीसंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी घेणार आहे. या याचिकेत केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि गरज पडल्यास त्यांना जबरदस्तीने अन्न भरवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता त्यांचं उपोषण जर सुरूच राहिले, तर येत्या काही दिवसांत वांगचुक यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आणि असं झालं तर याचे तीव्र पडसाद उमटू शकतात.