
Karjat-Jamkhed Constituency : कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात (Karjat-Jamkhed Constituency) बीएलओ यांच्यामार्फ़त मतदार याद्याचे (Voter List) विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम युद्धपातळीवर असून आजतागायत ५० टक्के काम पूर्ण झाले असून ज्या मतदारांनी अजून देखील आपले इन्यूमरेशन फॉर्म भरले नाही किंवा त्यांच्याकडे नियुक्त केलेले बीएलओ (BLO) आलेच नाही त्यांनी तत्काळ संबंधित नियुक्त बीएलओशी संपर्क करावा आणि आपले फार्म भरून घ्यावे. असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.
नक्की वाचा : बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा विस्तार : आमदार राजळे
मयत मतदार तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची मोहीम
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली २२७ कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अचूक बनवत त्यात पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे यासह दुबार नावे, मयत मतदार तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी बीएलओ, सहायक बीएलओ, पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून कर्जत-जामखेड मतदारसंघात आजमितीस सरासरी ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फॉर्म भरण्यास सहकार्य करण्याचे आवाहन (Karjat-Jamkhed Constituency)
कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण तीन लाख ५० हजार ५२४ मतदार असून यातील तीन लाख ४१ हजार ७५१ मतदारांना इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) वितरीत करण्यात आले आहे. यापैकी तब्बल एक लाख ७७ हजार ८५४ मतदारांचे इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) नियुक्त बीएलओनी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पटलावर यशस्वीपणे भरले आहेत. तर उर्वरीत एक लाख ७० हजार ५१० मतदार इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) भरण्याचे बाकी असून ज्या मतदारांनी आपले फॉर्म भरलेच नाही किंवा त्यांच्याकडे नियुक्त केले बीएलओ आलेच नाही त्यांनी गावचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नियुक्त बीएलओचा संपर्क क्रमांक घ्यावा व आपला इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) भरण्यास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.


