Monika Rajale : बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा विस्तार : आमदार राजळे

बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित

0
Monika Rajale : बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा विस्तार : आमदार राजळे
Monika Rajale : बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा विस्तार : आमदार राजळे

Monika Rajale : पाथर्डी : राज्य शासनाने (State Government) वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये मोठे बदल करून ऑनलाइन, पारदर्शक व सुलभ व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही शिफारशीची किंवा हेलपाटे मारण्याची गरज न पडता कमी कालावधीत योजनांचा लाभ मिळत आहे. बांधकाम कामगारांसाठीही विविध कल्याणकारी योजनांचा (Schemes) विस्तार करण्यात आला असून शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य आदी योजनांचा लाभ अधिकाधिक कामगारांनी घ्यावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी केले.

नक्की वचा : उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्या विरोधात ११ नगरसेवकांचे मतदान; सहा नगरसेवक गैरहजर

लाभ वितरणाचा संयुक्त मेळावा आयोजित

पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ वितरणाचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मर्यादित लाभ मिळत होता. कोणत्या लाभार्थ्याला प्राधान्य द्यायचे, याबाबत लोकप्रतिनिधींनाही अनेक अडचणी येत होत्या. मात्र केंद्र व राज्य शासनाने निधीत वाढ करून ऑनलाइन पद्धतीने पारदर्शक व्यवस्था लागू केल्याने पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळू लागला आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित (Monika Rajale)

बांधकाम कामगारांच्या नोंदणीनंतर त्यांना शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य. कर्ज , घरकुल व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात असून सर्व पात्र कामगारांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा. आपले बांधकाम नोंदणी कार्ड अशी वेळोवेळी नूतनीकरण करून घेऊन नवीन कामगार नोंदणी आपल्या आमदार कार्यालयातून सुरू असून त्याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा  असे आवाहन राजळे यांनी केले. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले, तर महेश हजारे यांनी आभार मानले.कार्यक्रमास सालसिद्धबाबा संस्थानचे अध्यक्ष हनुमंत महाराज शास्त्री, सरपंच भगवान हजारे, महेश हजारे, बापूराव पठाडे, दत्तात्र्य पठाडे, अंकुश कासुळे, अशोक घोंगडे, बाळासाहेब गोल्हार, वामन कीर्तने, नारायण पालवे, पिराजी कीर्तने, शेषराव घोंगडे, वसंत पवार, हरिभाऊ गाडेकर, प्रदीप पाटील, दिपक अंदुरे, केशव आंधळे, बाबासाहेब गर्जे, संजय खेडकर, महादेव जायभाये, महेश बोरुडे, हर्षद गर्जे, राजू शेख यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.