SIR : नगर : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातील अमरापूर येथे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक तसेच मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) संदर्भातील आढावा व समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.
नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
उपस्थितांना आवाहन
यावेळी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानाची सविस्तर माहिती दिली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून या प्रक्रियेत योगदान द्यावे तसेच लोकशाही बळकटीसाठी मतदार यादी पुनरीक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हे उपस्थित (SIR)
बैठकीस आमदार मोनिका राजळे, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील बूथ लेव्हल अधिकारी (BLO), बूथ प्रमुख, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.



