Yoga Training : नगर : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कारागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ या कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या नवीन तुकडीस प्रारंभ करण्यात आला.
नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन
हे उपस्थित
यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश उगले, जिल्हा कारागृह अधीक्षक संतोष कवार, जन शिक्षण संस्थेचे संचालक अनिल तांदळे आणि कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी बंदीवानांच्या पुनर्वसन व स्वावलंबनासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण महत्त्वाचे असून अधिकाधिक बंदीवानांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
रोजगाराच्या संधी (Yoga Training)
कारागृह अधीक्षक संतोष कवार यांनी मागील तुकडीतील प्रशिक्षणामुळे बंदीवानांना झालेल्या फायद्यांची माहिती देत भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात परतल्यावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शफाकत सय्यद यांनी केले तर अनिल तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



