Sonam Wangchuk : पारनेर : लडाखचे संरक्षण आणि संवैधानिक हक्कांसाठी नवी दिल्लीत आमरण उपोषण (Fasting To Death) करत असलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ (Scientist) आणि समाजसुधारक सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पारनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात आज शुक्रवारी (ता. १७) तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार दिपक कारखिले यांना निवेदन देण्यात आले.
नक्की वाचा : शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग; राहुरीत उसळली संतापाची लाट
थंडीत वापरण्यायोग्य ‘इको-फ्रेंडली टेंट’ विकसित
सोनम वांगचुक यांनी भारतीय लष्करासाठी कडाक्याच्या थंडीत वापरण्यायोग्य ‘इको-फ्रेंडली टेंट’ विकसित करून देशाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लडाखमधील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या वांगचुक यांना आशियातील प्रतिष्ठेच्या ‘मॅगसेस पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, राज्यघटनेच्या सहाव्या सूचीचा समावेश करावा आणि नीट परीक्षेतील पेपर फुटीसारख्या गंभीर गैरव्यवहारांविरोधात कडक कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वांगचुक यांच्या मागण्या रास्त (Sonam Wangchuk)
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंदोलनाचे वीस दिवस उलटूनही केंद्र सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक झाली असून, सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालत असल्याचा संशय उपस्थित करण्यात आला आहे. वांगचुक यांच्या मागण्या रास्त असून त्या सरकारने तत्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.”सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास पारनेर तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा या वेळी देण्यात आला.
या निवेदनावर युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे, आरपीआय (निकाळजे गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अमित जाधव , युवा अध्यक्ष ( निकाळजे गट) अजय साळवे, अमोल ठुबे, प्रदीप कसबे, दिपक साळवे, अशोक जाधव, संतोष गोरे, मंगेश पडवळ, भरत सोनवणे, कुणाल खुपटे, यश साळवे, हरिभाऊ अडसूळ, सागर बोरुडे आणि राजु उघडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहे.



