Job Fair : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ऑटोमोबाईल क्षेत्रातील रोजगार मेळावा

0

Job Fair : नगर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन

सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. उपप्राचार्य सोमनाथ जाधव यांनी तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा रोजगार मेळावा कार्यकारी समितीचे समन्वयक अमोल घोलप यांनी उमेदवारांनी रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मुलाखत प्रक्रियेत सहभाग (Job Fair) 

या रोजगार मेळाव्यात ऑटोमोबाईल क्षेत्रातील आठ कंपन्यांनी सहभाग नोंदविला. रोजगाराच्या संधींसाठी उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या मुलाखत प्रक्रियेत सहभाग नोंदविला.