Tambul : नगर : साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ (Mahur Tambul Prasad) या प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI) बहाल केले आहे. यामुळे माहूरचा तांबुल हा देशात तिरुपती लाडू प्रसादानंतर जीआय मानांकन मिळवणारा दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच मानांकनप्राप्त प्रसाद ठरला आहे.
नक्की वाचा : श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटवर फसवणूकीचा आरोप; ७ जणांवर गुन्हा दाखल
तांबूल हा मुख्य प्रसाद
माहूरगड श्री रेणुकामातेचा पानाचा विडा अर्थात तांबूल हा मुख्य प्रसाद आहे. पुरणावरणाच्या नैवेद्यानंतर देवीला तांबूल अर्पण केला जातो. ज्याठिकाणी देवीचे ठाणे आहे तेथे विशेषकरून विडा तांबूल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे. कित्येक वर्षांपासून तांबुलाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. केंद्र सरकारच्या चेत्रई येथील जिऑग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्रीने यासंदर्भातील प्रमाणपत्र नुकतेच जारी केले. हा ऐतिहासिक बहुमान मिळवून देण्यासाठी जीआय टॅगचे तज्ज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे यांनी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली. रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांचेही यासाठी महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश (Tambul)
जीआय मानांकन मिळवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, संस्कृती, परंपरा याची समग्र माहिती खात्याने दिल्याने दिलासा मिळाला आहे. माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाला जीआय मानांकन द्यावी लागते. केवळ माहिती देऊन भागत नाही, तर जीआय मानांकनाच्या निकषात बसण्यासाठी इतरही अनेक गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. “तीन वर्षांपासून तांबुलाला जीआय मानांकन मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. जीआय मानांकनामुळे आता माहूरचा तांबुल या नावाने कुठेही बनावट तांबूल विकता येणार नाही. यामुळे भाविकांची फसवणूक थांबेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील”, असे प्रा. डॉ. गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.



