Corona Virus Update : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे रुग्ण, आंध्रात चौघांचा मृत्यू; कुठे किती रुग्ण?

0
Corona Virus Update : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे रुग्ण, आंध्रात चौघांचा मृत्यू; कुठे किती रुग्ण?
Corona Virus Update : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे रुग्ण, आंध्रात चौघांचा मृत्यू; कुठे किती रुग्ण?

नगर : देशभरात एक दोन नव्हे तर तब्बल ३ वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीने (Corona Virus Update) पुन्हा मान वर काढली आहे. विशेषतः पुणे (Pune City) शहरात गेल्या दहा दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ (Rise in the number of COVID-19 patients) झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, सध्या आढळणारे बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांचे आहेत. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नसल्याने तज्ज्ञांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा : लालपरीचा प्रवास महागला, तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ

महाराष्ट्रात आतापर्यंत किती रुग्ण? (Corona Virus Update)

राज्य आरोग्य विभागाच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड-१९ चे ४८ रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या काळात कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेली जवळपास तीन वर्षे कोविडचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, यावर्षी जानेवारीपासून रुग्णसंख्येत हळूहळू वाढ दिसून येत आहे. जानेवारीमध्ये ३, फेब्रुवारीमध्ये १, जूनमध्ये ११ आणि जुलै महिन्यात आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, बहुतांश रुग्ण नियमित कोविड चाचण्यांमधून समोर आलेले नाहीत. इतर आजारांवरील उपचारादरम्यान किंवा शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये हे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.

अवश्य वाचा : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी राडा! पोलिसांनी सोनम यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये का नेलं?

 डॉक्टर नेमकं काय म्हणालेत? (Corona Virus Update)

पुण्यातील जहांगीर रुग्णालयातील डॉ. पीयूष चौधरी यांनी सांगितले की, २०२३ नंतर प्रथमच कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत कोविडबरोबरच इन्फ्लूएंझा रुग्णांची देखील संख्या वाढली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ एका रुग्णालयातच काही दिवसांत ७ ते ८ कोविड रुग्ण आढळले आहेत.

कोणती लक्षणे जाणवतात? (Corona Virus Update)

सध्या आढळणारा कोरोनाचा संसर्ग ओमिक्रॉन प्रकारापेक्षाही सौम्य असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. या रुग्णांमध्ये खोकला, सर्दी, घशात खवखव, थकवा यांसारखी लक्षणे दिसत असून ती साधारण तीन ते पाच दिवसांत कमी होत आहेत. त्यामुळे घाबरण्याऐवजी सतर्क राहणे गरजेचे आहे.