Sharad Pawar : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण; लेकीने शेअर केले फोटो

18 जुलै 1978 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ

0
Sharad Pawar : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण, लेकीने शेअर केले फोटो
Sharad Pawar : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण, लेकीने शेअर केले फोटो

Sharad Pawar : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली, त्याला आज 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ जुलै १९७८ रोजी त्यांनी प्रथमच मुख्यमंत्री (Chief Minister) पदाची शपथ घेतली. याची आठवण आणि त्या शपथविधीचे फोटो खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शेअर केले आहेत.

नक्की वाचा : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पारनेरमधून पुरोगामी संघटनांचा पाठिंबा

Sharad Pawar : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण, लेकीने शेअर केले फोटो
Sharad Pawar : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण, लेकीने शेअर केले फोटो

अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या एका ऐतिहासिक घटनेला आज अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून १८ जुलै १९७८ रोजी प्रथमच शपथ घेतली. तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत ते ‘सर्वात तरुण मुख्यमंत्री’ ठरले होते. यानंतर त्यांनी १९८८, १९९० आणि १९९३ अशा एकूण चार वेळा राज्याचे नेतृत्व केले. त्यांनी शेती, शिक्षण, सामाजिक न्याय, अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासात क्रांती घडवून आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे हे योगदान सदैव मार्गदर्शक राहील, असे सुळे यांनी म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम (Sharad Pawar)

सर्वाधिक काळ मुख्यमंक्षीपदावर राहिलेल्या नेत्यांमध्ये पवार यांचा तिसरा क्रमांक होता. अलीकडेच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना मागे टाकून हा क्रमांक पटकावला आहे. मात्र, सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम पवार यांच्याच नावावर आहे. पवार चार वेळा मु्ख्यमंत्री झाले असले तरी एकदाही त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही.शरद पवार यांनी पहिलेच मुख्यमंत्रीपद बंडखोरी करून मिळविले होते. आणीबाणीनंतर महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये पवार उद्योगमंत्री होते. 1978 मध्ये पावसाळी अधिवेशनात शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह 38 आमदारांना घेऊन बंडखोरी केली. दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात ‘समांतर काँग्रेस’ असा नवा गट स्थापन केला. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे सरकार अल्पमतात आले आणि ते सरकार पडले.

18 जुलै 1978 रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ

त्यावेळी 99 आमदार असलेल्या जनता पक्षाने पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला. पुलोद म्हणजेच पुरोगामी लोकशाही दल असे त्याचे नामकरण करण्यात आले. विधिमंडळ नेतेपदी पवार यांची निवड करण्यात आली आणि 18 जुलै 1978 रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे 1980 मध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. त्यांनी 17 फेब्रुवारी 1980 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी पवार यांचे सरकार बरखास्त केले आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. पवार यांचे पहिले मुख्यमंत्रीपद 1 वर्षे 214 दिवसांचे राहिले, असा राजकीय इतिहास आहे.