Radhakrishna Vikhe Patil : नगर : अहिल्यानगर शहर मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या आढावा बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेतील विविध त्रुटींवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धार्मिक स्थळांवर मतदार नोंदणी होत असल्याच्या तक्रारीसह बीएलओंकडून (BLO) अपुरे मार्गदर्शन, मतदारांच्या पत्त्यातील गोंधळ आणि जिवंत व्यक्तींना मयत दाखविण्यासारख्या गंभीर बाबी बैठकीत समोर आल्या आहेत. बाबत संबंधित प्रशासनाला याबात सूचना करण्यात आले असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा : लाखो मतदारांनी दिलेले प्रेम हीच माझी खरी संपत्ती : ॲड. प्रताप ढाकणे
एसआयआर मुळे सर्व प्रकार समोर
तसेच एस आय आर चा परिणाम परिणामन पश्चिम बंगाल मध्ये दिसून आला. त्यामध्ये अनेक घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. देशाच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे. एसआयआर मुळे सर्व प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातही याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. यावेळी बैठकीला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाळासाहेब सानप, नगरसेवक वर्षा सानप, विकी जगताप, मयूर बांगरे, सुरेश बनसोडे, प्रांत अधिकारी सुधीर पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कठोर कारवाई करण्याचे आश्वासन (Radhakrishna Vikhe Patil)
मुस्लिम समाजातील मतदारांची नोंदणी काही ठिकाणी मशिदींमध्ये होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांवर मतदार नोंदणीची प्रक्रिया राबविण्यास मनाई असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकाराची खात्री झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावर पालकमंत्री विखे पाटील यांनीही पुरावे उपलब्ध झाल्यास संबंधित बीएलओंवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.विशेष पुनरीक्षणादरम्यान एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या पत्त्यांवर नोंद झाल्याचे प्रकार समोर आल्याने नागरिकांनी फॉर्म क्रमांक ८ भरून दुरुस्ती करून घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले.
जिवंत व्यक्तींना मयत दाखविण्यासारख्या गंभीर त्रुटी
तसेच अनेक बीएलओ अर्ज भरण्याबाबत योग्य मार्गदर्शन करत नसल्याने पात्र मतदार अडचणीत येत असल्याची तक्रारही करण्यात आली.बीएलओंना मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी व आरोग्य सेविका संबंधित भागातील नसल्याने त्यांना स्थानिक माहिती नसते. त्यामुळे त्या-त्या परिसरातीलच सेविकांची नियुक्ती करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. मतदार यादीत जिवंत व्यक्तींना मयत दाखविण्यासारख्या गंभीर त्रुटीही निदर्शनास आल्याने त्या तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर शहरात काही विशिष्ट समाजाचे लोक बोगस दाखले तयार करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी. गेल्या काही दिवसापूर्वी अहिल्यानगर शहरात बांगलादेशी आढळून आले आहेत. त्यामुळे आपल्या गल्लीत आपल्या प्रभागातील नागरिकांनी जागृती दाखवावी. सदोष मतदार यादी तयार कारण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



