Vikhe Patil : जादा दराने खतविक्री करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

0
Vikhe Patil : जादा दराने खतविक्री करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Vikhe Patil : जादा दराने खतविक्री करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil : नगर : पुराव्यांसह लेखी तक्रारी आल्यास कोणालाही पाठीशी न घालता जादा दराने खतांची विक्री करणाऱ्या दुकानांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. साकूरच्या उपसा सिंचन योजना व भोजापूर चारीच्या कामासाठी निधीच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

नक्की वाचा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला अटक; तालुका पोलिसांची कामगिरी

हे उपस्थित

संगमनेर तालुक्यातील खरीप हंगाम व टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, वीज वितरण कंपनीचे प्रदीप वट्टमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे, जलसंपदा विभागाचे प्रदीप हापसे, अमोल कवडे, जलसंधारण विभागाचे अभियंता गायसमुद्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जलजीवन योजनेबाबत तक्रारी (Vikhe Patil)

तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणात प्राप्त तक्रारींवर विखे पाटील म्हणाले की, योजनेच्या कामावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ज्या गावांत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत, तेथे विभागाचे व स्वतंत्र यंत्रणेतील अधिकारी पाठवून कामाचे परीक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.