Vikhe Patil : राहुरीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वांबोरी चारीसाठी ५७ कोटींचा निधी : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

0
Vikhe Patil : राहुरीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वांबोरी चारीसाठी ५७ कोटींचा निधी : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Vikhe Patil : राहुरीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वांबोरी चारीसाठी ५७ कोटींचा निधी : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil : नगर : राहुरी शहर व तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत वांबोरी चारी टप्पा-१ साठी १७ कोटी रुपये आणि टप्पा-२ साठी ४० कोटी रुपये, असा एकूण ५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

नक्की वाचा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला अटक; तालुका पोलिसांची कामगिरी

हे उपस्थित

राहुरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम आणि तालुक्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अक्षय कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, अनुप यादव, प्रसाद मते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पालकमंत्र्यांचे निर्देश (Vikhe Patil)

पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेत प्रक्रिया पारदर्शक, अचूक व विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमवेत समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.