Harishchandragad Landslide : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी

0
Harishchandragad Landslide : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
Harishchandragad Landslide : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी

नगर : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad Landslide) एक मोठी दुर्घटना घडली आहे. गडावरून खाली उतरत असताना अचानक दरड कोसळल्याने मुंबईतील मालाड (Mumbai) येथील चार पर्यटक गंभीर जखमी (Four tourists seriously injured) झाले आहेत. रविवारच्या सुट्टीमुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली असताना ही दुर्घटना घडली.

नक्की वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

रिमझिम पाऊस सुरू असताना कोसळली दरड (Harishchandragad Landslide)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरातील १० पर्यटकांचा एक गट हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. रविवारी (ता.१९) दिवसभर पाऊस सुरू असताना, हा १० जणांचा गट गडावरून खाली उतरत होता. गडावरील आडव्या कठड्याच्या मागील बाजूला पोहोचले असता, अचानक दरड कोसळली. माती आणि दगडांचा ढिगारा अंगावर आल्याने दोन पर्यटक थेट मातीखाली गाडले गेले, तर इतर दोन जणांना दगडांचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

अवश्य वाचा : धर्मांतरानंतर अनुसूचित जातीचे लाभ मिळतील की नाही? सरकार घेणार मोठा निर्णय

गडावर दरड कोसळली तेव्हा सुदैवाने तेथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बांधलेले लोखंडी रेलिंग होते. या रेलिंगमुळे पर्यटकांना मोठा आधार मिळाला आणि ते खोल दरीत कोसळण्यापासून वाचले. अपघात घडताच सोबतच्या इतर पर्यटकांनी आणि तेथे उपस्थित असलेल्या एका स्थानिक ग्रामस्थाने तातडीने पायथ्याखालील गावाला आणि वन्यजीव विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने गडावर धाव घेतली. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांना उचलून गडाच्या पायथ्याशी आणले.

जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू (Harishchandragad Landslide)

जखमी पर्यटकांना तातडीने राजूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. राम प्रकाश यादव, निलेश गोमाटी विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश संजय साहू असं जखमी झालेल्या चार जणांची नावं आहेत. पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.