Camp : नगर : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिबिरात राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.
अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
२२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणार शिबीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाने २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या कालावधीत एका दिवशी शिबिर आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हे उपस्थित (Camp)
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वितरण या शिबिरातून करण्यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित राहणार आहेत.



