Appeal : नगर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत १८ जून २०२४ पासून राज्यात मधु केंद्र (मधुमक्षिकापालन) योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, युवक, युवती तसेच संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी. आर. मुंडे यांनी केले आहे.
अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
या सुविधा मिळणार
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधुउद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य खरेदीसाठी ५० टक्के अनुदान व उर्वरित ५० टक्के लाभार्थी हिस्सा, शासनाने निर्धारित केलेल्या हमीभावाने मध खरेदी, विशेष तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण तसेच मधुमक्षिकापालन, मधमाशांचे संवर्धन व जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
नक्की पहा : पंढरपूरच्या यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; भाविकांसाठी २३० जादा बसचे नियोजन
येथे करा संपर्क (Appeal)
केंद्र चालक संस्थांसाठी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या नावावर अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान चार हजार चौरस फूट सुसज्ज इमारत असावी. तसेच मधुमक्षिकापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.



