Preventive vaccination : राज्यभर १३ ऑगस्टपासून लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम

0
Preventive vaccination : राज्यभर १३ ऑगस्टपासून लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम
Preventive vaccination : राज्यभर १३ ऑगस्टपासून लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम

Preventive vaccination : नगर : राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम (फेरी-९) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार

लसींचा पुरवठा

या मोहिमेसाठी केंद्र शासनाकडून राज्याला उपलब्ध झालेल्या एक कोटी लसमात्रांचे वितरण आयव्हीबीपी संस्थेकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांपर्यंत लसींचा साठा वेळेत पोहोचावा, यासाठी शीत साखळीची आवश्यक खबरदारी घेऊन लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी पशुधनाला लाळखुरकूत रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार असून पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रोत्साहनपर अनुदान (Preventive vaccination)

लसीकरण परिणामकारक होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाचे जंतनिर्मूलन करण्यात येत असून आवश्यक औषधांचा पुरवठा संबंधित संस्थांना करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत सर्व खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पशुधनाचे लसीकरण करून त्याची नोंद एनडीएलएम (NDLM) प्रणालीवर केल्यास प्रति पशुधन पाच रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.