Anna Hazare : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या (Protest by students in Delhi) पार्श्वभूमीवर लोकशाहीत (Democracy) संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या उपस्थितीत मौन धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत गांधी स्मारक, वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे होणार आहे.
नक्की वाचा : मनोज जरांगेंची जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा आंदाेलनाला भेट; विद्यार्थ्यांनी धरला हिंदीत बाेलण्याचा आग्रह
आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक “नगरचे जंतर मंतर” नाव
आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर मंतर” असे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकशाही मूल्यांचे संरक्षण, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशीलता आणि संवादातून मार्ग काढण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी हे मौन धरणे आयोजित करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
“दडपशाही नव्हे, संवाद हवा” (Anna Hazare)
या आंदोलनातून “दडपशाही नव्हे, संवाद हवा”, “विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे”, “लोकशाही आणि संविधानाचे रक्षण झाले पाहिजे” असा शांततामय संदेश देण्यात येणार आहे.
या मौन धरणे आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, पाऊस असला तरी आंदोलन होणारच असल्याने लोकांनी छत्री घेऊन यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



