
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर (Jantar Mantar Delhi) येथे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले की, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा का ही जागा सोडलीत तर सरकार तुमचं आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मी हिंदी बोललो तर तुम्ही तुमचं हिंदी विसरुन जाल
मनोज जरांगे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा याठिकाणी असलेले अनेक अमराठी विद्यार्थी त्यांना हिंदीत बोलण्याचा आग्रह करत होते. मात्र, अभिजीत दिपके हे मनोज जरांगे मराठीत काय बोलतात, त्याचे भाषांतर करुन विद्यार्थ्यांना सांगत होते. तरीही काही विद्यार्थी मनोज जरांगे यांना हिंदीत बोलायचा आग्रह करत होते. यावर मनोज जरांगे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मिश्कील टिप्पणी केली. काय वेळ आलेय, मी मराठीत बोलतोय आणि हे हिंदीत सांगायले. मला हिंदी येत नाही, तोच प्रॉब्लेम आहे. पण मी हिंदी बोललो तर तुम्ही तुमचं हिंदी विसरुन जाल, असे जरांगे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मनोज जरांगे पाटील यांची जोरदार टीका (Manoj Jarange Patil)
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येकवेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवर अन्याय करते. या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर यांचं महारष्ट्रातील फिरण पूर्ण बंद होणार आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आम्ही देखील आंतरवाली सराटीला आंदोलन केले होते. तिकडेही गोरगरीबांच्या लेकरांवर, मायमाऊली, मुलींना आणि वृद्ध माणसांवर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला होता. आमच्यावर गोळ्या घातल्या होत्या. माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती, तुम्ही फक्त ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्यामागे आहे, तुम्ही दुसरीकडे गेलात तर आंदोलन मोडून टाकतील. हे सरकार आपण निवडून दिले आहे. हेच आज आपल्या लेकराबाळांवर उलटलेत, त्यांना उलटं करायची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये आहे, हे त्यांच्या ध्यानात नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.


