Shevgaon News : रक्षकच बनला भक्षक! शेवगाव घोटाळ्यात लाच मागणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित!

0
Shevgaon News : रक्षकच बनला भक्षक! शेवगाव घोटाळ्यात लाच मागणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित!
Shevgaon News : रक्षकच बनला भक्षक! शेवगाव घोटाळ्यात लाच मागणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित!

नगर : “रक्षकच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा काय होतं? शेवगावच्या (Shevgaon News) शेअर मार्केट घोटाळ्यात (Stock market scam) कोट्यवधी रुपये गमावलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याऐवजी लाचेचा फटका मिळालाय! तपासाच्या नावाखाली लाखो रुपयांची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अखेर निलंबनाची (Police Suspension) कारवाई झाली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय ते पाहू…

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार

नेमकं काय घडलं? (Shevgaon News)

शेवगाव येथील कोट्यवधी रूपयांच्या शेअर मार्केट घोटाळ्याची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. याच बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी काल मंगळवारी (21 जुलै) रात्री याबाबतचे आदेश काढले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाच्या पारदर्शकतेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या

शेवगावमधील या शेअर मार्केट घोटाळ्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यानच संबंधित गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप पुढे आला.

व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून साधायचा संपर्क (Shevgaon News)

गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, पोलीस अंमलदार दिनेश राठोड याने वारंवार व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधला. चौकशीच्या नावाखाली नोटिसा बजावून भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर, तुम्हालाही या गुन्ह्यात आरोपी केले जाईल, अशी भीती दाखवत स्वतःसह वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी लाखो रूपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या आरोपांबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.

संबंधित गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षकांकडून या तक्रारीची चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात हे आरोप गांभीर्याने घेण्याजोगे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिनेश राठोड याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडील काळात आर्थिक फसवणुकीच्या अनेक मोठ्या घटना उघडकीस आल्यात. त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्याकडून पोलिसच पैशांची मागणी करत असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या विश्‍वासार्हतेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करून पोलीस दलातील शिस्त अबाधित ठेवण्याचा संदेश देण्यात आल्याचे बोललं जात आहे.