DC : मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी 

0
DC : मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी
DC : मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी

DC : नगर : बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी, शासकीय व खासगी आरोग्य संस्थांनी तसेच सेवाभावी संघटनांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. आष्टी हा अहिल्यानगर जिल्ह्यालगतचा तालुका असल्याने जिल्ह्यातील अनेक रुग्ण या शिबिराचा लाभ घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंदणी, तपासणी, निदान, उपचार तसेच आवश्यक संदर्भ सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

पहा : मढीत एक महिला व पुरुष आक्षेपार्ह स्थितीत? संजय मरकड यांचा गंभीर आरोप

आढावा बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली बांगर, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. अजित विसपुते, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहान शाह, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. स्वप्नील तुपे, गणेश शिंदे, प्रवीण पोखडे तसेच विविध आरोग्य विभागांचे अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार

महत्त्वपूर्ण अभियान (DC) 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिर हे गरजू नागरिकांना तज्ज्ञ आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. शिबिरासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुलभ, जलद आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. शेजारील जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होत असले तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेणार असल्याने कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने आणि समन्वयाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.