Camp : प्रवरानगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभांचे वितरण

0
Camp : प्रवरानगर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभांचे वितरण
Camp : प्रवरानगर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभांचे वितरण

Camp : नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली असून प्रलंबित सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, शेतकरी कल्याण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तसेच कृषी पंपांच्या थकीत वीजबिलांची माफी यांसारखे निर्णय राज्याच्या विकासाभिमुख धोरणाचे द्योतक असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

नक्की वाचा : पारनेर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

प्रवरानगर येथे महसूल समाधान शिबिर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रवरानगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. 

मढीत एक महिला व पुरुष आक्षेपार्ह स्थितीत? संजय मरकड यांचा गंभीर आरोप

हे उपस्थित (Camp) 

यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, राहाता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक संजय कुंभार, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी उपस्थित होते.