Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता

0
Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Bhandardara Dam : नगर : भंडारदरा धरणातून (Bhandardara Dam) आज (ता. २३) प्रवरा नदीपात्रात (Pravara River) १ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून, पावसाचे प्रमाण लक्षात घेता या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे (Department of Water Resources) कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले आहे.

नक्की वाचा : बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार; सागर बेगसह तिघांवर गुन्हा दाखल

नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता

प्रवरा नदीकाठच्या अकोले, संगमनेर व ओझर बंधाऱ्याखालील राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रशासनाकडून आवाहन (Bhandardara Dam)

नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनीही योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.