Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार,कोणाला मिळणार लाभ?

0
Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार,कोणाला मिळणार लाभ?
Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार,कोणाला मिळणार लाभ?

नगर :  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी (Farm Loan Waiver) आज (ता.२४) प्रसिद्ध होणार आहे. याद्वारे ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी दिली आहे. तर आजच सगळ्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. पुण्यात आज होत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या कार्यक्रमात काही शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हस्ते कर्जमाफीच्या लाभाचे पत्र दिले जाईल,अशी माहिती आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, ‘हे’ काम लगेच करा नाहीतर कर्जमाफी हुकणार!

६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार (Farm Loan Waiver)

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील याबद्दल माहिती देताना म्हणाले की, आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन लाखापर्यंत थकीत कर्ज असलेली पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. राज्य शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील  ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

अवश्य वाचा : सर्पदंश झाल्यावर अगोदर करा ‘हे’ काम, घरीच वाचेल प्राण!

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकेने महाआयटीद्वारे विकसित केलेल्या योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांची अजूनही ॲग्रीस्टॅकवर नोंदणी नाही (Farm Loan Waiver)

या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार असून, ही सुविधा राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.