Bhandardara Dam: अकोले (Akole): तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भंडारदरा, निळवंडे, आढळा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरण (Bhandardara Dam) भरल्यात जमा असल्याने धरणातून सध्या 10,894 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे.
नक्की वाचा: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार,कोणाला मिळणार लाभ?
22 घरांचे नुकसान, दोन जनावरे दगावली (Bhandardara Dam)
महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात पावसामुळे आत्तापर्यंत 22 घरांचे नुकसान झाले असून दोन जनावरे दगावली आहेत. भंडारदरा येथील मारुती दगडू खाडे आणि ज्ञानेश्वर मारुती खाडे यांच्या घरांवरील पत्रे वाऱ्यामुळे उडाली. तर आंबेवंगण येथील प्रकाश त्रिंबक खाडे यांच्या घरावरील पत्रे उडून घराची भिंतही कोसळली आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
अवश्य वाचा: सर्पदंश झाल्यावर अगोदर करा ‘हे’ काम, घरीच वाचेल प्राण!
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान (Bhandardara Dam)
तर मुतखेल गावातील विजय हरिभाऊ शिंदे यांचा खिलारी बैल पावसाच्या तडाख्यात दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे, तर भंडारदरा धरणही भरल्यात जमा असल्याने धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
नक्की वाचा: अण्णा हजारे, मनोज जरांगे यांनी आधी आंदोलकांना समज द्यावी, विखे पाटील यांचा सल्ला
नागरिकांनी धरण परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे (Bhandardara Dam)
दरम्यान सततच्या पावसामुळे वारंघुशी–शेंडी–भंडारदरा मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. तसेच कृष्णावंती नदीतील पाणी पातळी वाढल्याने वाकी धरणातून निळवंडे धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नदी, नाले आणि धरण परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन महसूल व जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगरच्या मातीत बनलेल्या ‘हमसफर’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट लघुपटाने गौरव



