नगर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) म्हणजे विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी. वारकरी हे तब्बल २० ते २२ दिवसांपासून पायी वारी करत आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुरात येतात. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार,आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा (Ashadhi Ekadashi Mahapuja) पार पडते, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो. पण कोणत्या वारकऱ्याला मान द्यायचा हे कसं ठरतं? आणि कोण ठरवतं? हेच आज आपण जाणून घेऊयात…
नक्की वाचा : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार,कोणाला मिळणार लाभ?
मानाचे वारकरी कोण आणि कसं ठरवतात? (Ashadhi Ekadashi Mahapuja)
विठ्ठलाच्या पूजेचा मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीला आहे. विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला. १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा ही महापूजा केली जाते आणि त्यांच्यासोबत मानाचे वारकरी दाम्पत्य सुद्धा पुजेस उपस्थित असते. आणि ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे देण्यात आला आहे.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, ‘हे’ काम लगेच करा नाहीतर कर्जमाफी हुकणार!

विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात आले की, मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. आषाढीच्या आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता दर्शन रांग थांबवली जाते. दर्शन रांग जिथे थांबवली जाते तिथे पती-पत्नी कोण आहेत? याचा शोध घेतला जातो. पहिलं दांपत्य मिळाल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का? म्हणजेच ते वारकरी आहेत का? याची विचारणा केली जाते.
वारकरी दाम्पत्याला मिळतो मान? (Ashadhi Ekadashi Mahapuja)
जर त्या दाम्पत्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल तर त्या पती पत्नीची मानाचे वारकरी म्हणून निवड केली जाते. त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळवलेल्या या वारकरी दाम्पत्याला एक वर्षाचा एसटी प्रवासाचा मोफत पासही दिला जातो. तर अशा पद्धतीने भाग्यानेच किंवा विठ्ठल भक्तीनेच ही निवड होते.



