Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सपत्नीक विठूरायाची पूजा संपन्न

0
Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीसांची सपत्नीक विठूरायाची पूजा संपन्न

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) सपत्नीक आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने आज (25 जुलै) विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखले झाले होते. शासकीय परंपरेनुसार आज पहाटे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची पुजा (Vitthal Rukhmini Pooja) केली. त्यासोबतच आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि त्यांच्या पत्नी सौ प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्याला मिळाला.

हे वाचा: शेतकरी त्रैमासिकाच्या संपादन, मांडणी, छपाईसाठी संस्था निवडीची निविदा प्रसिद्ध

ही पूजा माझी नाही, ही पूजा विठ्ठल भक्तांची आहे (Devendra Fadanvis)

आपल्या भक्तासाठी विटेवर उभ्या असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी कोणत्याही निमंत्रणाविना भक्त पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. यावेळी भक्तांची 25 किलोमीटर रांग लागलेली आहे. त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. येणारा विठ्ठलभक्त सर्व प्रकारच्या क्षेत्रातून येणारा वारकरी आहे. त्यामुळे ही पुजा माझी नाही, ही पूजा विठ्ठल भक्तांची आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हेही वाचा: जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे आयोजन; राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधीव

सरकारसाठी विठ्ठलाला काही मागायची गरज नाही (Devendra Fadanvis)

सरकारसाठी विठ्ठलाला काही मागायची गरज नाही, त्याला आपल्या मनातलं सर्व कळतं. राज्यात चांगला पाऊस पडावा. शेती चांगली पिकावी, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिशा देण्याकरीता नवा अध्याय सुरु केलाय, त्यालाही आशिर्वाद मिळावा, पंढरपूर कॉरिडॉरचं यावर्षीच काम सुरु झालं पाहीजे. दोन ते अडीच वर्षात काम पुर्ण होईल, असेही फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा: मेंढ्याचा कळप शेतात उतरल्याचा राग धरत मेंढपाळास मारहाण; कर्जत तालुक्यातील घटना

देवेंद्रजींना मी महाराष्ट्रातच ठेवणार आहे (Devendra Fadanvis)

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं की, देवेंद्रजींना मी महाराष्ट्रातच ठेवणार आहे. आम्हाला, मला महाराष्ट्रातच राहायचे आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान आज (25 जुलै) आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठूरायची पूजा संपन्न झाली आहे.