Firodia Shivajians Football Club : अहिल्यानगर : गणेश मित्र मंडळ, सैनिक नगर आयोजित सरपंच चषक फुटबॉल स्पर्धेत (Sarpanch Cup Football Tournament) फिरोदिया शिवाजियन्स एफसीने (Firodia Shivajians Football Club) अंतिम सामन्यात सुमन एफसीचा ३-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
साखळी फेरीतील तीन्ही सामने जिंकून गटात अव्वल
लीग कम नॉकआऊट पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स एफसीने साखळी फेरीतील तीन्ही सामने जिंकून आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले. उपांत्य फेरीत सॉकर क्लबचा ४-० असा दणदणीत पराभव करत संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सुमन एफसीवर ३-० असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्पर्धेत गोल न स्वीकारता विजेतेपद (Firodia Shivajians Football Club)
अंतिम सामन्यात मयूर गोरखा, दर्शन पवार आणि सूरज शर्मा यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फिरोदिया शिवाजियन्स एफसीने स्पर्धेतील सर्व पाच सामने जिंकले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत संघाने एकही गोल न स्वीकारता विजेतेपद मिळवले.
बक्षीस वितरण सरपंच विजय खोमणे आणि फरताळे (BHU) यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुशील लोट, राकेश घावरी, सचिन वाल्मिकी आणि सनी वाघेला यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि मेहनतीमुळे स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल फिरोदिया शिवाजियन्स एफसीच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



