Chhatrapati Shivaji Maharaj Mahsul Samadhan Shibir: अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन

0
Chhatrapati Shivaji Maharaj Mahsul Samadhan Shibir: अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन
Chhatrapati Shivaji Maharaj Mahsul Samadhan Shibir: अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन

Chhatrapati Shivaji Maharaj Mahsul Samadhan Shibir: अहिल्यानगर : अपर तहसील कार्यालयाच्यावतीने शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्वस्तिक चौक, अहिल्यानगर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (Chhatrapati Shivaji Maharaj Mahsul Samadhan Shibir) आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा: दिल्ली वेस परिसरातील खोदकाम तात्काळ थांबवा; पुरातत्त्व विभागाचे श्रीगोंदा नगरपरिषदेला आदेश, कारवाईचा अहवालही मागविला

आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती (Mahsul Samadhan Shibir)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिरात आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या अभियानाचा उद्देश महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, तक्रारींचा सत्वर निपटारा करणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय राबविण्यात येत असलेल्या या अभियानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेचे दैनंदिन प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली काढणे आणि प्रशासकीय सेवा अधिक गतिमान करणे अपेक्षित आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांची कामे एकाच ठिकाणी करण्यात येणार (Mahsul Samadhan Shibir)

या समाधान शिबिराच्या माध्यमातून महसूल विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग तसेच विविध महामंडळे, संस्था आणि इतर शासकीय विभागांशी संबंधित नागरिकांची कामे एकाच ठिकाणी करण्यात येणार आहेत. विविध दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी सर्व प्रमुख विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार असून विविध शासकीय सेवा थेट नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या महसूल समाधान शिबिराचा लाभ घ्यावा (Mahsul Samadhan Shibir)

अहिल्यानगर (शहर) विधानसभा मतदारसंघ क्रमांक २२५ मधील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या महसूल समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

नक्की वाचा: खरीप पीक स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन