Water Filter for Students : डॉ. डी.टी. शाह आणि पार्थ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर आणि गणवेश वाटप

Water Filter for Students : डॉ. डी.टी. शाह आणि पार्थ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर आणि गणवेश वाटप

0

Water Filter for Students : राशीन : समाज विकास संस्थेचे, हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथे डॉ. डी.टी. शाह आणि पार्थ वेल्फेअर फाउंडेशन (Parth Welfare Foundation) यांच्यावतीने स्व. सुरेखा दिलीप शहा यांच्या स्मरणार्थ हशु आडवाणी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर मशीन (Water Filter for Students) आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप (Distribution of uniforms to students) कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पिण्याच पाणी

या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन एस काझी साहेब होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. डी.टी शहा तसेच पार्थ वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शांताराम पडवळकर ,उपाध्यक्ष संतोष लठ्ठे, शाह मॅडम, समाज विकास संस्थेच्या कार्यकारी निरीक्षका आस्मा काझी मॅडम उपस्थित हाेते.

Water Filter for Students : डॉ. डी.टी. शाह आणि पार्थ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर आणि गणवेश वाटप
Water Filter for Students : डॉ. डी.टी. शाह आणि पार्थ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर आणि गणवेश वाटप

विद्यार्थ्यांची गरज ओळखून विद्यार्थ्यांसाठी मदतीची आवाहन करण्यासाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शिंदे आजिनाथ सर यांच्या विशेष पाठपुराव्याने कर्तुत्वान व्यक्तींच्या दातृत्वातून हा कार्यक्रम घडून आला. आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांची पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता या माध्यमातून दूर झाली. तर त्यांच्या वतीने अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी रिया शिंदे हिने अनमोल सहकार्याबद्दल मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य नष्टे यांचा सन्मान (Water Filter for Students)

या कार्यक्रम प्रसंगी जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२६ च्या निमित्ताने राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार श्री.राजेंद्र नष्टे सर यांना प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य मा.श्री.राजेंद्र नष्टे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये पार्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी दशेत आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या आधारे गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करत असल्याची भावना व्यक्त केली. आयुष्यात कुठल्याही कामाचा कमीपणा न बाळगता कष्ट करत राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाची अध्यक्ष निवड श्री.सागर नष्टे यांनी केले तर अनुमोदन श्री. दिगांबर साळवे यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विठ्ठल काळे यांनी केले.