Crime News Update | नगर : अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारी विश्वातील (Crime News Update) मोठी बातमी समोर आली आहे. मकोका प्रकरणातील फरार आरोपी विजू पठारे याला तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी नगरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचून शेंडी बायपास परिसरातून त्याला आज (ता. ३) ताब्यात घेतले.
विशेष पथकाची स्थापना (Crime News Update)
मकोका प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा
तातडीने कारवाई (Crime News Update)
या पथकाला आरोपी विजू पठारे हा पांढरी पूल मार्गे नगरमध्ये येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. पथकाने शेंडी बायपास परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, सुजय हिवाळे, भानुदास खेडकर आणि सुमित गवळी यांच्या पथकाने केली आहे.



