Rohit Pawar | भाजपकडून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम; आमदार रोहित पवार यांच्याकडून गंभीर आरोप

0

Rohit Pawar | नगर : मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात (SIR) भाजपकडून नवीन प्रकार केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. भाजपकडून गाव पातळीवर पक्षातील कार्यकर्त्यांकडून स्वतंत्रपणे अॅपचा वापर करून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. यात भाजपच्या बाजूने कोण, संदिग्ध कोण व विरोधक कोण याची नोंद करण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच या संदर्भात त्यांनी काही फोटोही प्रसिद्ध केले आहेत.

हे वाचा – संगमनेर तालुक्यातील सातवा मैल फाट्याजवळ भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

आपले, संदिग्ध व विरोधी असे तीन पर्याय ( Rohit Pawar )

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, मतदार पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) मोहीम हे एक भयानक प्रकरण आहे. या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली, हे पश्चिम बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिलं. एकीकडं हे SIR प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपानेही गावपताळीवर आपल्या मतदार केंद्र स्थित अधिकारी मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली असून त्यांना दिलेल्या लिंकमध्ये मतदारांची पडताळणी केली जाते आणि ही पडताळणी करताना या लिंकमध्ये मतदारांच्या नावापुढे आपले, संदिग्ध व विरोधी असे तीन पर्याय दिलेले आहेत. यापैकी एका पर्यायाची निवड करुन मतदारांची वर्गवारी करण्याचं काम सुरु आहे.

नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा

गंभीर दखल घ्यावी ( Rohit Pawar )

रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत. शासकीय यंत्रणा SIR मोहीम राबवत असेल तर त्याच वेळी भाजपनेही आपली समांतर यंत्रणा या कामी कशी लावली? संदिग्ध आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचा किंवा त्यांना भलत्याच ठिकाणी दाखवण्यासाठी तर हे केले जात नाही ना? कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांच्या वैयक्तिक किंवा गोपनीय रेकॉर्ड्चा वापर करुन स्वतःची समांतर राजकीय मोहिम चालणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं कोर्टाने सांगितलं असतानाही भाजप हे कोणत्या अधिकारात करत आहे?या प्रश्नांची उत्तरं भाजपाने द्यावीत आणि निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here