Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment : स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलाला जन्मठेप; शेवगाव तालुक्यातील घटना

Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment : स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलाला जन्मठेप; शेवगाव तालुक्यातील घटना

0
Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment : स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलाला जन्मठेप; शेवगाव तालुक्यातील घटना
Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment : स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलाला जन्मठेप; शेवगाव तालुक्यातील घटना

Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment : नगर: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथे स्वतःच्या अल्पवयीन मुलीची प्रेमसंबंधाच्या कारणावरून हत्या (Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment) करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्यावर रातोरात अंत्यसंस्कार केल्याच्या खळबळजनक प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आई, वडील आणि आजीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील मामाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा निकाल दिला.

फिर्यादीला युवकालाही केली होती मारहाण

आरोपी साईनाथ दिनकर गरड, छाया साईनाथ गरड आणि पद्मावती दिनकर गरड (रा. शेकटे बुद्रुक, ता. शेवगाव) अशी शिक्षा झालेल्याची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी आणि फिर्यादी युवक यांच्यात प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना झाल्यानंतर त्यांनी या संबंधाला तीव्र विरोध केला होता. घटनेच्या काही दिवस आधी आरोपींनी फिर्यादीला घरी बोलावून मुलीचा नाद सोडण्याची धमकी देत मारहाण केली होती. त्यानंतर पीडित मुलीनेही फोन करून आई-वडील आपल्याला जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीला सांगितले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संगनमत करून मुलीची हत्या (Parents who killed their own daughter sentenced to life imprisonment)

याचदरम्यान मुलीच्या आईनेही फिर्यादीला फोन करून आमची इज्जत जाण्यापेक्षा आम्ही तिला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचा उल्लेख न्यायालयीन नोंदीत करण्यात आला. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री आरोपींनी संगनमत करून अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरासमोरच जाळून रातोरात अंत्यसंस्कार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता राखही गोळा करून अन्यत्र फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी प्रियकराच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खून, पुरावा नष्ट करणे आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या वेळी आरोपी छाया गरड या शेकटे बुद्रुकच्या सरपंच होत्या. बचाव पक्षाने मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा दावा केला. तसेच घटनेच्या रात्री छाया गरड या रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेल्या होत्या, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, त्या दवाखान्यातून परत आल्यानंतरही मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नाही. उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे विचारात घेत न्यायालयाने हा बचाव ग्राह्य धरला नाही. या खटल्यात सरकार पक्षाने फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच, नोडल अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांसह एकूण १३ साक्षीदार तपासले. त्यांच्या साक्षी आणि सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल देवराम ढगे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. हा खटला जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात आला. पैरवी अधिकारी पीएसआय महेश जोशी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. एन. बेळगे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

तपासातील त्रुटींवर न्यायालयाचे ताशेरे
या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने तपासातील काही त्रुटींवरही गंभीर निरीक्षण नोंदविले. तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, सहायक पोलीस निरीक्षक शेळके तसेच दोषारोपपत्राची छाननी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.