Kapad Bazar | अखेर कापड बाजारातील रस्त्याचा मुहूर्त ठरला; आज पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात

0

Kapad Bazar | नगर : अहिल्यानगर शहरातील कापड बाजार ( Kapad Bazar ) येथील भिंगारवाला चौक ते छबुराव लांडगे चौक या रस्त्याच्या कामाला आज (ता. ५) सुरुवात होणार आहे. पुढील एक महिना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी (ता. ४) या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आले आहेत. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांनी या रस्त्याची पाहणी केली.

नक्की वाचा : सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; संग्राम जगताप यांची काँग्रेसवर टीका

अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज मोहीम राबवली असून कापड बाजारातील मोची गल्ली, महावीर कॉर्नर, गंज बाजार, सोनार गल्ली, शहाजी रोड, तेली खुंट, सर्जेपुरा, भिंगारवाला चौक या समोर रोडवरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बाजारातील भिंगारवाला चौक ते छबुराव लांडगे चौक या रस्त्याच्या कामाला आज (ता. ५) पासून सुरुवात होणार असून पुढील एक महिना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे याच अनुषंगाने अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार जगताप यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

अवश्य वाचा – अहिल्यानगर जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणार : मुम्मका सुदर्शन

महापौर व उपमहापौरांकडून नगरकरांना आवाहन

यावेळी उपमापौर धनंजय गाडे म्हणाले की, कुठलीही बाजारपेठ ही त्या शहरचं आर्थिक हृदय असतं महापालिकेच्या वतीने दर्जेदार रस्ते देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पुढे ते म्हणाले की आमदार संग्राम जगताप, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विशेष लक्ष आपल्या अहिल्यानगर शहरावर असून आपण पुढील महिनाभरासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महापौर ज्योती गाडे म्हणाल्या की, आमदार संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम होत आहे. ही जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असून जिल्हाभरातून ग्राहक येथे खरेदीसाठी येत असतात ग्राहकांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी योजना तयार केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, येथे पार्किंगची व्यवस्था नसल्याने येत्याकाळात रंगभवनची चार मजली इमारत आपण पार्किंगसाठी उपलब्ध करून देत आहोत तसेच जनता बाजारातसुद्धा दोन मजली पार्किंग उपलब्ध करून देत आहोत तसेच व्यापाऱ्यांकडून सातत्याने स्वच्छतागृहाची मागणी होत होती तर तीही आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत असे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, महापालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक तसेच महायुतीचे पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here