One-year ban on paneer analogue : अहिल्यानगर : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेत अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) म्हणजेच एफडीएने (FDA) ‘पनीर ॲनालॉग’च्या (One-year ban on paneer analogue) विक्रीवर 1 वर्षाची बंदी घातली आहे. 30 जुलै रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या आदेशानुसार पनीरसारखे दिसणाऱ्या या बनावट पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल.
कारण काय?
एफडीएने एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत राज्यातून तपासलेले 308 पनीरचे नमुने धक्कादायक आहेत. त्यापैकी 109 म्हणजे 35.4% नमुने निकृष्ट किंवा असुरक्षित आढळले. 79 नमुने निकृष्ट दर्जाचे30 नमुने असुरक्षितअनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य चरबी वापरल्याचे समोर आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कोठे बंदी लागू? (One-year ban on paneer analogue)
हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, क्लाऊड किचन आणि सर्व खाद्यसेवा आस्थापनांना या ‘पनीर ॲनालॉग’चा कोणत्याही पदार्थात वापर करण्यास, साठवण्यास किंवा ग्राहकांना देण्यास सक्त मनाई आहे. दिसायला पनीरसारखे असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी कृती ही अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन मानली जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘पनीर ॲनालॉग’ विरोधात कठोर बंदीचा निर्णय घेतला. मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. मार्च 2025 च्या अधिवेशनात मी हा प्रश्न सभागृहात मांडला होता. पनीरच्या नावाखाली जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्यासाठी उचललेले महत्वाचे पाऊल आहे. माझी विनंती आहे की या बंदीची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे व्हावी. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आता सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ थांबेल अशी अपेक्षा आहे.-
आमदार विक्रम पाचपुते,
श्रीगोंदा ,अहिल्यानगर
संघटनांनी केले स्वागत
‘ऑल फूड ॲण्ड लायसन्स होल्डर्स फाउंडेशन’चे अध्यक्ष ॲड. अभय पांडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘पनीर ॲनालॉग’मुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होता, हा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता, असे ते म्हणाले.त्यामुळे यापुढे राज्यातील बाजारपेठेत आणि हॉटेलमधून ‘पनीर ॲनालॉग’ हद्दपार होणार आहे.



