Vandalism of a Dargah in Ahilyanagar City : अहिल्यानगर शहरातील पठार शाहावली दर्ग्याची तोडफोड; अज्ञाताविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हादाखल

Vandalism of a Dargah in Ahilyanagar City : अहिल्यानगर शहरातील पठार शाहावली दर्ग्याची तोडफोड; अज्ञाताविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हादाखल

0

Vandalism of a Dargah in Ahilyanagar City : नगर : अहिल्यानगर शहरातील तोफखाना परिसरातील नवरंग व्यायामशाळेजवळ असलेल्या पठार शाहावली दर्ग्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड (Vandalism of a Dargah in Ahilyanagar City) केल्याची घटना बुधवारी (ता.५) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की,

आवेज तमीजोद्दीन काझी (वय ३३, रा. जुना मंगळवार बाजार, काझी गल्ली, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ते आशा टॉकीज परिसरात ‘मोबाईल शॉपी’ हे दुकान चालवतात. ते नेहमीप्रमाणे नवरंग व्यायामशाळा मार्गे घरी जाताना रस्त्यालगत असलेल्या पठार शाहावली दर्ग्याला अभिवादन करत असतात. बुधवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे मित्र अजिम नुरमहमद राजे व अमीर नासिर खान यांच्यासह तारकपूर बसस्थानकावरून चहा घेऊन दिल्लीगेटमार्गे घरी जात होते. यावेळी दर्ग्याजवळ पांढऱ्या रंगाचा टेम्पो उभा असल्याचे त्यांना दिसले. तसेच दर्ग्याचा काही भाग तोडल्यासारखा दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता दर्ग्याच्या वरच्या भागाची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप (Vandalism of a Dargah in Ahilyanagar City)

यानंतर तिघांनी तत्काळ तोफखाना पोलिसांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक दर्ग्याची तोडफोड करून नुकसान केले असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.