Pune RTO : पुणेकरांच्या वाहनावर आता ‘MH 12 ZZ’ कायम राहणार! गडकरींची भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा

0
Pune RTO : पुणेकरांच्या वाहनावर आता 'MH 12 ZZ' कायम राहणार! गडकरींची भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा
Pune RTO : पुणेकरांच्या वाहनावर आता 'MH 12 ZZ' कायम राहणार! गडकरींची भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा

नगर : पुणे शहराची ओळख असलेला ‘MH 12’ हा आरटीओ (Pune RTO) कोड यापुढेही कायम राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या पुण्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH 12 ZZ’ ही शेवटची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर पुण्यासाठी कोणती नवीन मालिका सुरू करायची,असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सकारात्मक तोडगा काढल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

MH 61 च्या चर्चांना पूर्णविराम (Pune RTO)

पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘MH 12 ZZ’ नंतर पुढील नोंदणीसाठी पुणे आरटीओला ‘MH 61’ ही नवीन सिरीज दिली जाण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ‘MH 12’ ही केवळ एक वाहनांची मालिका नसून ती पुण्याची एक खास ओळख बनली आहे. त्यामुळे ही ओळख बदलू नये, अशी पुणेकरांची भावना होती.

अवश्य वाचा : कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप

देशात पहिल्यांदाच एका नव्या सिरीजचा प्रस्ताव (Pune RTO)

विषयाचे गांभीर्य ओळखून मुरलीधर मोहोळ यांनी नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. पुण्याची हीच ओळख कायम ठेवण्यासाठी देशात पहिल्यांदाच ‘एक अंक आणि एक अक्षर’  म्हणजेच ‘MH 12 1A’ अशा स्वरूपाची नवीन मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ‘MH 12’ हा कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता पुण्यात वाहनांवर ‘MH 12 1A’ ही नवी सिरीज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.