
Mahatma Phule Agricultural University : नगर : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक येथील वनस्पती रोग शास्त्र विभागातील (Department of Plant Pathology) सहाय्यक प्राध्यापक रोगशास्त्रज्ञ डॉ. पोपट खंडागळे यांनी मायकोरायझा या बहुउपयोगी, सजीवोपयोगी बुरशीला कृत्रिमरित्या वाढविण्यासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये छोट्या ज्यूटच्या बॅगचा वापर करून मका मायकोरायझा इनक्युबेशन (Maize Mycorrhiza Incubation) साधन तयार केले आहे. त्यास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यता दिली आहे.
नक्की वाचा : नाशिक -पुणे थेट रेल्वे मार्ग होण्याच्या आशा पल्लवित; परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना
मक्याची मुळे ही 18 सेंटीमीटर पर्यंत वाढतात
कमी कालावधीमध्ये, कमी खर्चात व पुनर्वापर करता येणारे हे साधन असून ज्यामध्ये मक्याचे बी व मायकोरायझाचे मातृवान अनुक्रमे एक ग्रॅम घेऊन त्यात 50 ग्रॅम माती घेतली जाते. पूर्ण अंधारात असलेल्या या ओलसर जूटच्या बॅगमध्ये आठ ते दहा दिवसात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून मक्याचे बी व मायकोरायझाला वाढण्यासाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती होते. यामध्ये बुरशीला आवश्यक असणारे पाणी व सापेक्ष आद्रता मिळाल्यामुळे आठ ते दहा दिवसांमध्ये मक्याची मुळे ही 18 सेंटीमीटर पर्यंत वाढतात.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा हा एक पुढचा पर्याय (Mahatma Phule Agricultural University)
त्या मुळावर वाढणार्या मायकोरायझा बुरशीच्या केशाकरशीय जालीका व तंतूमुळे त्यास अपेक्षित पद्धती अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात याप्रकारे कृत्रिमरीत्या तयार केलेला मायकोरायझा हा आपल्याला पुढील मातृवान म्हणून तसेच इतर पिकांच्या वाढीसाठी वापरता येतो. मायकोरायझा तयार करण्यासाठी लागणारा कालावधी या तंत्रज्ञानाच्या वापराने कमी होतो. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा हा एक पुढचा पर्याय म्हणून उपलब्ध होताना दिसून येत आहे. हे साधन तयार करण्यासाठी वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.टी. गायकवाड, गहू विशेषज्ञ प्रा. बी.एम. म्हस्के, डॉ. एस.बी. गावडे, डॉ. एन.एम. मगर, डी.बी. पाटील व डॉ. पी.बी. खैरे यांचे सहकार्य लाभले.


