Nashik-Pune Railway Line : नाशिक -पुणे थेट रेल्वे मार्ग होण्याच्या आशा पल्लवित; परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना

परीक्षण करण्याची मागणी करणारे निवेदने प्राप्त

0
Nashik-Pune Railway Line : नाशिक -पुणे थेट रेल्वे मार्ग होण्याच्या आशा पल्लवित; परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना
Nashik-Pune Railway Line : नाशिक -पुणे थेट रेल्वे मार्ग होण्याच्या आशा पल्लवित; परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना

Nashik-Pune Railway Line : नगर : पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे मार्गाच्या (Nashik-Pune Railway Line) आखणीचा खोडद, (जिल्हा पुणे) येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वर होणाऱ्या परिणामांचे परीक्षण करण्यासाठी, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर (Anil Kakodkar) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झाला आहे. यामुळे नाशिक -पुणे थेट रेल्वे मार्ग होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नक्की वाचा : नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आता एक झेंडा निषेधाचा आंदोलन

सुधारित रेल्वे मार्ग निश्चित

पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे मार्ग हा राज्य शासनाचा एक प्राधान्यक्रमाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. प्रकल्प अहवालांतर्गत (DPR) प्रस्तावित केलेली मूळ आखणी नारायणगावजवळील खोडद (जिल्हा पुणे) येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (GMRT) प्रकल्पाच्या जवळून जात असल्याचे आढळून आले होते. यामुळे या सुविधेत केल्या जाणाऱ्या संवेदनशील खगोलीय निरीक्षणांमध्ये संभाव्य विद्युतचुंबकीय अडथळा निर्माण होण्याबाबत वैज्ञानिक संस्था आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा व विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे एक सुधारित रेल्वे मार्ग निश्चित केला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

परीक्षण करण्याची मागणी करणारे निवेदने प्राप्त (Nashik-Pune Railway Line)

त्यानंतर थेट रेल्वे मार्ग किंवा बोगदे अथवा उन्नत मार्ग यांसारखे तांत्रिक बदल करून, GMRT च्या अखंडतेला कोणताही धोका न पोहोचवता रेल्वे मार्ग काढणे शक्य आहे का? याचे सखोल परीक्षण करण्याची मागणी करणारे निवेदने सातत्याने प्राप्त होत आहेत. ही बाब शासनाच्या लक्षात येताच शासनाने या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाद्वारे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली. यामुळे नाशिक -पुणे थेट रेल्वे मार्ग होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

९ ऑगस्टला जनआंदोलनाची हाक

दरम्यान, नाशिक ते पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. ही मागणी फक्त एखाद्या शहराची नसून या मार्गासाठी सर्वांनी आंदोलनात उतरण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या जनआंदोलनासाठी वाढता प्रतिसाद मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.