
Vikhe Patil : नगर : श्री साईबाबा शिर्डी संस्थान येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या भाविकांच्या सुविधांसाठी वाहन पार्किंग,राहण्याची व्यवस्था, दर्शनरांग व परिक्रमा मार्ग ,स्वच्छतागृह आणि शहरात सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नक्की वाचा : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मका-मायकोरायझा इनक्युबेशन साधनाला डिझाइन पेटंट प्राप्त
यांची उपस्थिती
श्री साईबाबा मंदिर संस्थानाच्या झिरो सभागृहात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांचा आढावा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नगराध्यक्षा श्रीमती जयश्री थोरात, उपनगरअध्यक्ष अभय शेळके, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नगरपालिका मुख्याधिकारी दिघे ,पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्यासह शिर्डी शहरातील सर्व नगरसेवक,पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.या भाविकांना उच्च दर्जाच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान, नगरपालिका , पोलीस प्रशासन,स्थानिक ग्रामस्थ यांनी पुढाकार घ्यावा. शिर्डी ही आध्यात्मिक नगरी म्हणून तयार व्हावी, यामध्ये येणाऱ्या भाविकाला स्वच्छता, निवास, वाहन पार्किंगची व्यवस्था तसेच वृद्धांसाठी वेटिंग खुर्च्या, पार्किंग ठिकाणापासून मंदिरापर्यंत मंदिर संस्थानाच्या ईव्ही शटल बस सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण (Vikhe Patil)
शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शहरातील नागरिकांची सुरक्षा अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच विनापरवाना एकही वाहन शहरात प्रवेशित होणार नाही याची दक्षता घ्यावी . यात ऑटो रिक्षांची तपासणी करण्याचे निर्देश बैठकीत पोलीस प्रशासनाला देण्यात आले.


