
Life-threatening attack on a young man : नगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ठेकेदार संस्थेच्या एका तरुण कर्मचाऱ्यावर (Attack on a municipal corporation employee in the Mukundnagar area) काही अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने प्राणघातक हल्ला (Life-threatening attack on a young man) केल्याची घटना गुरुवारी (ता.७) घडली. या हल्ल्यात धीरजसिंग परदेशी (Dhirajsingh Pardeshi) (वय २२, रा. माधवबाग, भिंगार) हा गंभीर जखमी (Seriously injured) झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

अनपेक्षित हल्ल्यात गंभीर जखमी
प्राथमिक माहितीनुसार, धीरजसिंग परदेशी हा महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट असलेल्या ठेकेदार संस्थेमार्फत मुकुंदनगरातील दर्गा दायरा परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत होता. याचवेळी काही जणांनी अचानक त्याच्यावर धारदार तलवारीने हल्ला चढविला. या अनपेक्षित हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल (Life-threatening attack on a young man)
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून साक्षीदारांकडून माहिती घेतली जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी धीरजसिंग परदेशी याची विचारपूस केली. त्यांनी जखमीच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेत योग्य उपचार करण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान, हल्ल्याची माहिती शहरभर वेगाने पसरल्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर घटनेची चर्चा सुरू होताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रुग्णालय परिसरासह संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्याचे कारण आणि आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


