Flag Hoisting : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन

0
Flag Hoisting : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
Flag Hoisting : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

Flag Hoisting : नगर : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते उद्या (ता. १५) सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्ते टार्गेट; आमदार संग्राम जगताप यांचा आरोप

हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले जाणार

हा सोहळा पोलीस मुख्यालय (पोलीस परेड ग्राउंड), अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या या राष्ट्रीय पर्वानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले जाणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन (Flag Hoisting)

जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्य दिनाचा आनंद आणि अभिमान द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.