
Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर महापालिकेतील (Municipal Corporation) कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी खून प्रकरणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी शुक्रवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अहिल्यानगर पोलिसांवर (Ahilyanagar Police) गंभीर आरोप केले. यावेळी त्यांच्या समवेत परदेशी यांची पत्नी पल्लवी परदेशी याही उपस्थित होत्या.
नक्की वाचा : शरद पवारांची टीका अन् फडणवीसांचे उत्तर; त्यात रोहित पवारांची उडी
अनेक खोटे गुन्हे दाखल
आमदार जगताप म्हणाले, धीरज परदेशी खून प्रकरणाची खरी घटना व त्यामागील आमच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचाव्यात व पीडित कुटुंबीयांना त्वरित न्याय मिळावा यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेत आहे. नगरच्या पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. घटना घडल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आवाज पोलीस दाबत आहेत. त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी कोण आहेत हे निष्पन्न केले नसून त्यांना अटकही केलेली नाही. जे आरोपी अटक केले ते मारेकरींना मदत करणारे आरोपी पकडले आहेत. पोलीस अधिकारी प्रमुख आरोपींना पाठीशी घालत आहे का? अशी शंका व्यक्त होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लवकरच देवेंद्र फडणवीस यांना भेटणार (Sangram Jagtap)
नगरचे पोलीस अधिकारी ही घटना वेगळा मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात आहे. याला वाचा फुटावी, न्याय मिळाला यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. धीरजच्या पत्नीच्या पाठीशी आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहोतच. पण त्यांना शासनानेही सन्मानजनक नोकरी देणे आवश्यक आहे, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत.हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे, पीडित परदेशी कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.
आमदार जगताप म्हणाले की
आमदार जगताप म्हणाले, अंत्यविधीच्या वेळी झालेल्या हिंदुत्ववाद्यांच्या आंदोलना नंतर पोलिसांची तपासाची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. नगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलूबुर्गे, डीवायएसपी दिलीप टिपरसे यांनी गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करून वेगवेगळ्या केसमध्ये अडकवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला हे वरिष्ठ पोलीस अधिकारी वैयक्तिक वेगळा रंग देण्याच्या प्रयत्नात आहेत, हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. या घटनेच्या बाबतीत आमचा आता पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आयजी व डीआयजी यांनी वाटल्यास वेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या प्रकरणी केली तरच योग्य पद्धतीने तपास योग्य दिशेने तपास जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडिया माध्यमातून मोठ्या प्रमाणात खोटे आरोप
धीरज परदेशी यांची पत्नी पल्लवी परदेशी म्हणाल्या, माझ्या पतीच्या निधनानंतर सोशल मीडिया माध्यमातून मोठ्या प्रमाणात खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या पतीची याप्रकरणी काहीही चूक नाही. ते मूळचेच धार्मिक व हिंदू विचाराचे होते. ते रोजच अभिमानाने भगवा टिळा लावत असे. घटना घडली त्यादिवशी दुपारी एक वाजता माझे व पतीचे फोन द्वारे शेवटचे संभाषण झाले. त्यांचा व आरोपींचा काही एक संबंध नाही. तसेच त्यांचे कोणाशीही भांडण नव्हते. तरीही पोलीस अधिकारी काही खोट्या व चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण येत आहेत.


