Police Medals Announced : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर; २६ कर्मचाऱ्यांचाही होणार विविध पदकांनी सन्मान

पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

0
Police Medals Announced : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर; २६ कर्मचाऱ्यांचाही होणार विविध पदकांनी सन्मान
Police Medals Announced : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर; २६ कर्मचाऱ्यांचाही होणार विविध पदकांनी सन्मान

Police Medals Announced : नगर : स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर शौर्यपूर्ण कामगिरी, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी देशभरातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना विविध पोलीस पदकांची घोषणा (Police Medals Announced) करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात (District Police Force) कार्यरत असताना केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले आहे. यासह इतर २६ पोलीस कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली आहेत.

नक्की वाचा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

या सन्मानासाठी पोलीस उपनिरीक्षक संपत मुरलीधर खैरे, सध्या सुपा पोलीस ठाणे येथे कार्यरत; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश चंद्रकांत उपासनी, नागरी हक्क संरक्षण, अहिल्यानगर पथक येथे कार्यरत; तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद, पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.पोलीस दलात कर्तव्य बजावताना दाखविलेली निष्ठा, सातत्यपूर्ण कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण सेवेला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील पावती मानली जात आहे. तीनही अधिकाऱ्यांचे या सन्मानाबद्दल पोलीस दलातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जाहीर झालेल्या या सन्मानामुळे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

२६ पोलीस कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर (Police Medals Announced)

यासह हेमंत शिवाजी थोरात, मनोहर नामदेव शेजवळ, संजय जबाजी खंडागळे, अन्वरअली सय्यदअली सय्यद, विजय गोरखनाथ लोंढे, किरण प्रकाश शेलुकर, सचिन वसंत पवार, रेहान अजिज शेख, कृष्णा नाना कुऱ्हे, दिगंबर रावसाहेब कारखिले, रंगनाथ जयराम नरसाळे, मल्लिकार्जुन कैलास बनकर, कृष्णा बबनराव विधाटे, राजू आप्पासाहेब सुद्रिक, संदीप कचरू पवार, संतोष बापूराव ओव्हळ, सचिन महादेव जाधव, दिपक भास्कर घाटकर, अभिजीत दत्तात्रय अरकल, सुयोग संजय सुपेकर, सुरेश चंद्रकांत माळी, माधुरी साहेबराव तोडमल, किर्ती जगन्नाथ कांजवणे, भाग्यश्री गंगाधर भिटे, राहुल भाऊसाहेब सोळुंके, अमोल बाबासाहेब घुले या २६ पोलीस कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली आहेत.