Trapped Mother | कोपरगाव : शहरातील सिद्धिविनायक कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये बाथरूममध्ये अडकलेल्या महिलेला ( Trapped Mother ) चक्क कोपरगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने क्रेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढावे लागले. शुक्रवारी (ता. १४) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बाथरूममध्येच अडकल्या ( Trapped Mother )
हकीकत अशी की, कोपरगावच्या सिद्धिविनायक कॉलनी येथे वाहुळ कुटुंबीय राहते. छाया सुरेश वाहुळ या सायंकाळी घरातील बाथरूममध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा घरात होता. आई बाथरूममध्ये असताना मुलाने अनवधानाने बाथरूमची कडी बाहेरून लावून घेतली. त्यामुळे छाया वाहुळ या बाथरूममध्येच अडकल्या.
नक्की वाचा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
क्रेनच्या सहाय्याने फ्लॅटमध्ये प्रवेश ( Trapped Mother )
आई बाथरूममध्ये अडकल्याने लहान मुलगा घरात रडू लागला, तर छाया वाहुळ यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा तसेच मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ कोपरगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी काही क्षणांतच घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने फ्लॅटपर्यंत पोहोचत कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये अडकलेल्या छाया वाहुळ यांची सुखरूप सुटका केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या बचावकार्यात कोपरगाव नगरपरिषदेचे फायरमन प्रमोद सिनगर, सागर काटे आणि संजय विधाते यांनी तत्परतेने सहभाग घेतला. अग्निशामक दलाने वेळीच केलेल्या मदतीमुळे छाया वाहुळ यांची सुखरूप सुटका झाली.



