Pachamba Yatra : नालेगावातील वारुळाच्या मारुती मंदिरात आज ‘पचंबा यात्रा’; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0
Pachamba Yatra : नालेगावातील वारुळाच्या मारुती मंदिरात आज 'पचंबा यात्रा'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Pachamba Yatra : नालेगावातील वारुळाच्या मारुती मंदिरात आज 'पचंबा यात्रा'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Pachamba Yatra : नगर : शहरातील नालेगाव परिसरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वारुळाचा मारुती मंदिरामध्ये आज (ता. १७) पारंपरिक ‘पचंबा यात्रा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी होत आहे. नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी भरणारे हे यात्रेचे स्वरूप यंदाही भव्य असून, संपूर्ण नालेगाव परिसर भाविकांच्या गर्दीने आणि चैतन्याने ओसंडून वाहू लागला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भाविकांची गर्दी

यात्रेनिमित्त वारुळाचा मारुती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली आहे.

उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक

भाविकांचा उत्साह (Pachamba Yatra)

दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरू, महिला आणि लहान मुलांच्या मनोरंजनासाठी परिसरात विविध प्रकारची खेळणी, पाळणे, मिठाई आणि घरगुती वस्तूंचे स्टॉल्स सज्ज झाले आहेत. विशेषतः आज सायंकाळच्या सुमारास यात्रेला मुख्य स्वरूप येणार असून, संपूर्ण अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण भागातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावणार आहेत.