Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!

Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!

0
Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!
Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!

“आज झाडे जपली तरच उद्या सावलीचा मेवा मिळेल!” — नितीन शेलार

Pledge to plant 5555 trees : अहिल्यानगर : “आपल्या वॉटर बॅगमधील उरलेले पाणी झाडांना टाका. घरातील महत्त्वाच्या वस्तू जशा आपण जपतो, तशीच झाडांचीही काळजी घेतली पाहिजे. आज आपण झाडे जपली, तरच भविष्यात आपल्याला सावलीचा मेवा मिळणार आहे,” असा पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश माजी नगरसेवक नितीन शेलार यांनी दिला.

सावेडी येथील जय बजरंग प्राथमिक विद्यालयात () शिवगामिनी फाउंडेशनच्या वतीने पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांच्या ग्रीन सिटी अभियानांतर्गत सावलीदार वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयातील तब्बल ८०० विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ‘ग्रीन सिटी–ग्रीन आर्मी’ची शपथ घेत ५५५५ वृक्षरक्षणाचा निर्धार (Pledge to plant 5555 trees) केला. यावेळी शेलार बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.

Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!
Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!

क्रांती दिनी हरितक्रांतीचा संकल्प!

प्रास्ताविकात शिवगामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. गायत्री गुंड पाटील यांनी फाउंडेशनच्या आगामी पर्यावरण अभियानाची माहिती देताना सांगितले की, “क्रांती दिनाच्या निमित्ताने हरितक्रांती आणण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील सहा शाळांमध्ये तब्बल ५५५५ रोपांचे वितरण करण्यात येणार आहे. पुढील क्रांती दिनापर्यंत शहरातील सावलीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसेल, असा आमचा संकल्प आहे.”या संकल्पामुळे वृक्षारोपणापासून वृक्षसंवर्धनाकडे जाणाऱ्या व्यापक अभियानाला नवी दिशा मिळाली आहे.

Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!
Pledge to plant 5555 trees : ८०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; ५५५५ रोपांचा महासंकल्प!

“रोप लावा अन् नातेवाईकासारखे जपा!” (Pledge to plant 5555 trees)

विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना लावलेल्या प्रत्येक रोपाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. “वृक्षारोपण करणे ही सुरुवात आहे; मात्र रोप जगवणे ही खरी पर्यावरणसेवा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या झाडाची नातेवाईकाप्रमाणे काळजी घ्यावी,”असे त्यांनी सांगितले.ॲड. महेश शिंदे यांनी शिवगामिनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, “वृक्षसंवर्धनातूनच आपले जीवन आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे,” असे प्रतिपादन केले.प्रा. डॉ. रमेश वाघमारे यांनी वृक्षांचे इकेगाई’ स्पष्ट करताना मानवी जीवनातील वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

८०० हात एकवटले; वृक्षरक्षणाची शपथ घेतली!

कार्यक्रमातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे प्रमुख अतिथी, शिक्षक, पालक आणि ८०० विद्यार्थ्यांना ‘ग्रीन सिटी–ग्रीन आर्मी’ची शपथ देण्यात आली. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प यावेळी करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यालय परिसरात ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष–एक जबाबदारी’ या भावनेला बळ मिळाले.

कार्यक्रमास ॲड. महेश शिंदे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, ॲड. रजनी ताठे, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, शिवगामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. गायत्री गुंड पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पालक महिला प्रतिनिधी म्हणून सौ.रमा भैरी, वैशाली शिंदे, वैशाली वारे, सुमन शेवाळे, वैशाली मिसाळ आदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. पूजा बनकर, रोहित पुंडे, अभिजीत कांबळे, ॲड. दिनेश शिंदे आणि ॲड. आरती शिंदे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले, तर ॲड. मेहूल गांधी यांनी आभार मानले.

शाळेच्या अंगणातून शहराच्या हरित भविष्याकडे!
५५५५ रोपे, ६ शाळा आणि हजारो विद्यार्थ्यांचा हरितसंकल्प या माध्यमातून शिवगामिनी फाउंडेशनने वृक्षारोपणाला जनचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बजरंग विद्यालयातील हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम न राहता “झाड लावा, झाड जगवा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सावली निर्माण करा”या संदेशाची प्रभावी सुरुवात ठरली.