Vegetable Festival : श्रीगोंदा येथे आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव उत्साहात

Vegetable Festival : श्रीगोंदा येथे आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव उत्साहात

0
Vegetable Festival : श्रीगोंदा येथे आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव उत्साहात
Vegetable Festival : श्रीगोंदा येथे आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव उत्साहात

Vegetable Festival : नगर : श्रीगोंदा कृषी अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा येथे तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आत्मा (ATMA) अंतर्गत रानभाजी महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवामध्ये रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म, नैसर्गिक शेतीतील महत्त्व आणि ग्रामीण जीवनातील उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोग्यदायी अन्नसंपदा

कार्यक्रमामध्ये आत्मा अंतर्गत नंदकुमार घोडके व अनिल औटी यांनी रानभाज्या या ग्रामीण भागातील आरोग्यदायी अन्नसंपदा असून त्यांचे संवर्धन आणि दैनंदिन आहारात समावेश करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील शेतकरी महिलांनी विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी त्यांचे असलेले महत्त्व याविषयी माहिती दिली. नैसर्गिक शेतीत पिकणाऱ्या रानभाज्या रासायनिक अवशेषांपासून मुक्त असल्यामुळे त्यांचे सेवन केल्यास निरोगी जीवनशैलीस मोठी मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

चिंचोली काळदात फाट्यावर रास्ता रोको; आमदार संग्राम जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

नैसर्गिक शेतीला चालना (Vegetable Festival) 

या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, सर्व उपकृषी अधिकारी व सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, सर्व कृषी सख्या, तसेच युवा प्रगतशील शेतकरी योगेश किसन होले, गणेश होले आणि परिसरातील अनेक प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रानभाज्यांचे विविध स्टॉल पाहून त्यांची माहिती जाणून घेतली व अशा उपक्रमांमुळे पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन होण्यास तसेच नैसर्गिक शेतीला चालना मिळण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्रीगोंदा कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.